माझी कुणबी नोंद · Mazi Kunbi Nond · Android ॲप
शेवटचे अद्यतन: ६ सप्टेंबर २०२६
हे ॲप वापरणे म्हणजे खालील अटी स्वीकारणे. या अटी ॲपमधील कायदेशीर संमती पडद्याशी जुळतात.
हे ॲप महाराष्ट्र शासन, भारत सरकार किंवा कोणत्याही जिल्हाधिकारी / तहसील कार्यालयाचे अधिकृत ॲप नाही. हे स्वतंत्र तांत्रिक साधन आहे. विकासक कोणत्याही शासकीय संस्थेचे प्रतिनिधी नाहीत.
गाव नोंदी, फेरफार आणि PDF दुवे महाराष्ट्र जिल्हाधिकारी कार्यालयांच्या सार्वजनिक संकेतस्थळांवरून (उदा. satara.gov.in, pune.gov.in, kolhapur.gov.in) संकलित आहेत. ॲप मूळ सरकारी नोंद तयार करत नाही किंवा बदलत नाही.
दाखवलेले अभिलेख जुने, हस्ताक्षरीत आणि अनेकदा अस्पष्ट स्कॅन आहेत. ॲप अधिकृत प्रमाणित सत्यप्रत देत नाही. जात प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन कामासाठी तहसील अभिलेख कक्ष, उपविभागीय कार्यालय किंवा aaplesarkar.mahaonline.gov.in वरून अधिकृत प्रत घ्या.
AI वाचन केवळ सोयीसाठी आहे. फिकट शाई, जुनी लिपी आणि खराब स्कॅन यांमुळे नावे, नाते, गाव किंवा तारीख चुकीची येऊ शकतात. हा मजकूर न्यायालयात किंवा जात पडताळणी समितीसमोर पुरावा नाही. अधिकृत कामासाठी शासनमान्य मोडी तज्ज्ञ किंवा मूळ अभिलेख तपासा.
कुणबी / OBC जात प्रमाणपत्र मंजूर करणे किंवा नाकारणे हा उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा जात पडताळणी समितीचा अधिकार आहे. ॲप कोणतीही मंजुरीची हमी देत नाही.
ॲप वापरणे, न वापरता येणे, चुकीचे वाचन, खंडित इंटरनेट किंवा बाह्य दुवे यामुळे झालेल्या कोणत्याही नुकसानीस विकासक जबाबदार नाहीत.
ॲप विनामूल्य ठेवण्यासाठी Google AdMob जाहिराती दाखवल्या जातात. जाहिरातींशी शासन किंवा विकासकाचा थेट संबंध नाही. जाहिरात पाहणे किंवा त्यावर क्लिक करणे हा तुमचा निर्णय आहे.
प्रश्न: dtulservice@gmail.com